छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर-पुणे

।। श्रीशक्ती ।।
शिवराजास आठवावे । जीवित तृणवत् मानावे 

छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर-पुणे

सुस्वागतम्

छत्रपती सेवा प्रतिष्ठान मध्ये आपले स्वागत आहे! छत्रपती शिवाजी महाराजांचे अवघे जीवन हे सर्वांना सर्वकाळ प्रेरित करणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजस्वी चरित्र घराघरात पोचवण्याचे आणि मनामनात रुजवण्याचे कार्य ‘छत्रपती सेवा प्रतिष्ठान’ करत आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक शिवयोगी श्री विजयराव देशमुख यांनी वयाच्या १९ व्या वर्षीच शिवचरित्राचा अभ्यास, संशोधन आणि प्रसार करण्याचे व्रत अंगिकारले होते. या कार्याला संघटनात्मक स्वरूप देण्यासाठी ‘छत्रपती सेवा प्रतिष्ठान’ ची स्थापना १९७४ साली नागपूर येथे करण्यात आली. स्थापनेपासूनच प्रतिष्ठानने व्याख्यानमाला, ग्रंथ प्रकाशन, किल्लेदर्शन यात्रा, विद्वतजनांना पुरस्कारित करणे असे विविध उपक्रम राबवत आहे. प्रेरित कार्यकर्ते आणि सर्वसामान्य शिवप्रेमी नागरिक यांचे अखंड प्रेम संस्थेला लाभत आले आहे. त्याच्या पाठबळावरच आपल्या कार्याचा अधिकाधिक विस्तार प्रतिष्ठान करत आहे.  जगभरातील शिवप्रेमी एकमेकांना जोडण्याचे आणि त्यातून राष्ट्राभिमानी, चारित्र्यसंपन्न नागरिक घडवण्याचे  ‘छत्रपती सेवा प्रतिष्ठान’ चे कार्य अव्याहत सुरु आहे आणि ते भविष्यातही वृद्धिंगत होईल.       

shakkarte shivray-marathi edition

३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त शिवभक्तांना अनमोल भेट

'शककर्ते शिवराय' ची शिवआवृत्ती फक्त ५०० रुपयांत

तेजस्वी शिवयोगी श्री विजयराव देशमुख यांनी अनेक वर्षे अथक परिश्रम, संशोधन, असंख्य साधनांचा, दस्तऐवजांचा चिकित्सक वृत्तीने अभ्यास केला. यांतून `शककर्ते शिवराय` हे शिवचरित्र सिद्ध झाले आहे. अस्सल पुराव्यांचा आधार, रसाळ आणि ओघवती भाषाशैली ही या ग्रंथाची वैशिष्ट्ये होत. शककर्ते शिवराय हा एक संदर्भ ग्रंथ म्हणून अवघ्या महाराष्ट्रात मान्य झाला आहे. पिढ्यान् पिढ्या जतन करून ठेवावे आणि प्रत्येक शिवप्रेमीने नियमित वाचन, मनन आणि चिंतन करावे असे १२०० पृष्ठांचे २ खंड असलेले हे प्रासादिक शिवचरित्र केवळ ५०० रुपयांत ‘ना नफा’ तत्वावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिवरायांचे तेजस्वी चरित्र घराघरात पोचावे यासाठी या ‘शिव आवृत्ती’ साठी लेखक, प्रकाशन आणि विक्रेते शून्य रुपये मानधन-नफा आकारत आहेत. ही सवलत पुढील वर्षीच्या शिवराज्याभिषेक दिनापर्यंतच उपलब्ध आहे त्यामुळे आजच आपली प्रत घेऊन जा.  ५०० रुपये मूल्य असलेल्या या शिवआवृत्ती सोबत, १८०० रुपये मूल्य असलेली ‘शककर्ते शिवराय’ ची ‘प्रीमिअम क्वालिटी’ प्रत भरघोस सवलतीच्या दरात अर्थात  केवळ ८०० रुपयांत उपलब्ध आहे.    

प्राप्तिस्थळ:

पुणे: छत्रपती सेवा प्रतिष्ठान कार्यालय, मनोरमा, २ रा मजला, १०८८, बाजीराव रस्ता, जनता बँकेसमोर, शनिपार चौकाजवळ, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०. संपर्क: मंगेश बरबडे, मो. ९९२१२३७९९९ 

नागपूर: छत्रपती सेवा प्रतिष्ठान कार्यालय, गुरुमंदिर, ८०- आर. बी. आय. कॉलनी, जयप्रकाश नगर, खामला, नागपूर ४४००२५  

शककर्ते शिवराय ची शिवआवृत्ती आणि प्रतिष्ठानने प्रकाशित केलेले इतर ग्रंथ आपण घरपोच सुद्धा मागवू शकता. 

तेजस्वी शिवयोगी: समर्पित जीवन

तेजस्वी शिवयोगी: समर्पित जीवन

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र ऐकणाऱ्या, वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये सकारात्मकतेचा प्रकाश पडतोच एवढे ते भारून टाकणारे, प्रखर आणि जाज्वल्य आहे. त्याचा अंगीकार प्रत्येकजण आपापल्या जीवनात वृत्ती आणि क्षमतेनुसार करत असतो. मात्र शिवरायांच्या जीवनचरित्राचा अभ्यास संशोधन, प्रचार-प्रसार निरपेक्ष वृत्तीने करण्याचे आणि शिवचरित्राच्या माध्यमातून पिढ्या घडवण्याचे व्रत जीवनभर स्वीकारणारे समर्पित ध्येयवादी अगदी मोजके आहेत. त्यापैकीच एक आहेत श्री विजयराव देशमुख उपाख्य सद्गुरूदास महाराज. शिवचरित्राचा अभ्यास, संशोधन आणि प्रचार-प्रसार हेच आपले जीवितकार्य आहे हा दृढ संकल्प त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षीच सोडला होता. या संकल्पाची अखंड पूर्तता ते आजवर करीत आले आहेत. शिवचरित्र याच एका विषयावर त्यांनी हजारोंच्या संख्येने व्याख्याने दिली आहेत, विपुल ग्रंथनिर्मिती त्यांनी केली आहे. अभ्यासू शिवप्रेमींसाठी त्यांनी असंख्य ‘किल्लेदर्शन यात्रा’ आयोजित केल्या आहेत. शिवचरित्राच्या प्रकाशात अनेक पिढ्यांचे जीवन त्यांनी उजळवून टाकले आहे.  म्हणूनच त्यांना समर्पित जीवन जगणारे ‘तेजस्वी शिवयोगी’ असे संबोधले जाते.  

शिवकथाकार श्री विजयराव देशमुख (उपाख्य प.पू. सद्गुरुदास महाराज) विरचित ग्रंथसंपदा