छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर-पुणे

आमच्याविषयी

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या हिंदुस्थानचा मानबिंदू, श्रद्धास्थान तसेच प्रेरणास्थान…….!  देव, देश आणि धर्मासाठी प्राणपणाने कार्य करण्याची प्रेरणा शिवचरित्रातून मिळते.  ही केवळ प्रेरणा न राहता, त्यातून राष्ट्रधर्म जागविण्यासाठी, जागता राखण्यासाठी अविरत निष्ठेने प्रयत्नरत राहणं हीच श्री छत्रपतींना आपली खरी मानवंदना ठरते. याच जाणिवेतून आणि भावनेतून `शककर्ते शिवराय` या शिवचरित्र ग्रंथाचे निर्माते, प्रख्यात शिवव्याख्याते श्री विजयराव देशमुख यांच्या प्रेरणेतून १९७४ साली घटस्थापनेच्या मुहुर्तावर श्री छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर ही संस्था शिवकार्यार्थ स्थापित झाली. 

चैतन्याने ओतप्रोत भरलेल्या शिवप्रेरणेतून मन, मेंदू आणि मनगट बळकट होऊन या राष्ट्राचे खऱ्या अर्थाने उत्थान होऊ शकते आणि त्याचसाठी छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली पाच दशके अव्याहत कार्य सुरु आहे.  यातून महाराष्ट्रात हजारो निष्ठावंत शिवप्रेमींची पिढी उदयास आली. प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांतून छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारे शिवभक्त तयार झाले आणि शिवकार्य अधिक वेगाने होऊ लागले. छत्रपती शिवाजी महाराज ही केवळ आमची अस्मिताच नव्हे तर आमच्या भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही काळांना तेजस्वी प्रेरणेने जोडणारी विलक्षण शक्ती आहे. या शक्तीचा वास प्रत्येकाच्या मनात, घरात आणि नगरात असायलाच हवा आणि त्याचसाठी श्री छत्रपती सेवा प्रतिष्ठान व्यापक कार्य करते. छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे कार्य तसेच त्यासंबंधी माहिती आपण याच संकेत स्थळावर बघू शकता.

कार्यकारिणी

छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर

(रजि. नं.- F1789(N)

संस्थापक
प. पू. श्री सद्गुरूदास महाराज (शिवकथाकार श्री. विजयराव देशमुख)

अध्यक्ष:  श्री अजेय देशमुख 

उपाध्यक्ष: श्री संजय बारहाते

सचिव: श्री भालचंद्र देशकर

सहसचिव: श्री प्रसन्न बारलिंगे

कोषाध्यक्ष: श्री कल्याण पुराणिक  

कार्यकारी विश्वस्त: श्री अनिरुद्ध उद्धव आणि श्री मोहन बरबडे