छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर-पुणे

ग्रंथलेखन

शककर्ते शिवराय

shakkarte shivray-marathi edition

शककर्ते शिवराय

शिवचरित्र लेखन हे एक राष्ट्रीय कार्य आहे. शिवचरित्र हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अंश आहे. दुर्देवाने, भारताला जो इतिहास आहे असे सांगितला जाते, तो पराभवांचा इतिहास आहे. याचे कारण म्हणजे, तो लिहिण्यासाठी जी साधनं उपलब्ध आहेत, ती बव्हंशी परकियांनी लिहिली आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनात परकियांकडून भारताच्या पराभवाचेच चित्रण केले गेले. त्या आधारावर लिहिला गेलेला इतिहास भारताचा म्हणून सांगितले जाते. या इतिहासाच्या परिशीलनामुळे आमची दृष्टी निर्जीव झाली. कर्तृत्व दिशाहीन होऊ लागले. इतकंच नव्हे तर आकलनातही वैचारिक गोंधळ होऊ लागला. या पार्श्वभूमीवर, अस्सल शिवचरित्र लेखनाचे महत्त्व किती आहे, हे लक्षात येते. सन १९७४ साली रायगडावर एका भारवलेल्या अवस्थेत, शिवकथाकार श्री विजयराव देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर शिवचरित्र लेखनाचे शिवधनुष्य उचलण्याचा संकल्प केला. अथक परिश्रम, संशोधन, असंख्य साधनांचा, दस्तऐवजांचा चिकित्सक अभ्यास यांतून अखेर `शककर्ते शिवराय` हे शिवचरित्र सिद्ध झाले. अस्सल पुराव्यांचा आधार, रसाळ आणि ओघवती भाषाशैली ही या ग्रंथाची वैशिष्ट्ये होत. शककर्ते शिवराय हा एक संदर्भ ग्रंथ म्हणून अवघ्या महाराष्ट्रात मान्य झाला आहे. शिवचरित्राचा रस कायम ठेऊन प्रत्यक्ष पुराव्यांसह विद्वत्तापूर्ण शोधावर आधारित असा हा ग्रंथ शिवअभ्यासकांसाठी जणू प्रमाण ग्रंथ ठरतो. या ग्रंथाच्या माध्यमातून विजयराव देशमुख यांनी आणखी दोन बहुमोल धर्मकार्य करुन ठेवली. एक म्हणजे, इतिहासकारांना ज्ञात नसलेली राजमाता जिजाऊसाहेबांची जन्मतिथी शोधून काढली. आणि दुसरे म्हणजे, अस्सल पुराव्यांच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी पुढे आणून त्यासंबंधीचा वादही संपुष्टात आणला. 

या ग्रंथाचे हिंदी भाषेत भाषांतर झाले आणि शिवाजी महाराजांचे चरित्र खऱ्या अर्थाने भारतभरात पोहोचले. द्वीखंडात्मक असे हे शिवचरित्र आपल्या प्रत्येकाच्या घरात, कार्यालयात, ग्रंथालयात असायलाच हवे, तरच शिवछत्रपतींच्या दिव्य कार्याचा अंश आपल्यालाही स्पर्शून जाईल…त्यात दडली प्रेरणा आपलं जगणं समृद्ध बनवेल. 

राजा शंभू छत्रपती

राजा शंभू छत्रपती

१९८७ साली शिवकथाकार विजयराव देशमुख एका व्याख्यानमालेसाठी अहमदनगर येथे आले होते. त्यावेळी त्यांना तेथील ऐतिहासिक संग्रहालयात जुन्या दौलताबादी कागदावर रेखाटलेले १७ व्या शतकातील एक चित्र दाखवण्यात आले. ते चित्र होते, देव-देश-धर्मासाठी बलीदान करण्यापूर्वी छत्रपती शंभूराजेंच्या हालाप्तेषांचे आणि त्याही अवस्थेत महाराजांच्या नेत्रातून फुललेल्या अंगाराचे. ते पाहून शिवकथाकार स्तब्ध झाले आणि त्यांनी व्याख्यानं बंद करुन शंभूराज्यांच्या चरित्राचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. बखरकार आणि आधुनिक काळातील नाटककारांनी शंभूराजांचे रंगवलेले चित्र हे त्यांची बदनामी करणारं आहे, प्रत्यक्षात त्यांच्यावरील आक्षेपांना समर्थन देईल, असा एकही पुरावा अस्सल कागदपत्रांत आढळत नाही. शिवदुर्गदर्शन यात्रेमध्ये सातारच्या राजमाता सुमित्राराजे भोसले, यांनी शिवकथाकारांजवळ ही खंत बोलून दाखवली आणि शंभूराजेंचे खरे दर्शन घडविणारे चरित्र सर्वसामान्य लोकांना समजू शकेल, अशा भाषेत लिहावे, अशी सूचना केली. त्यांची ही आज्ञा शिरसावंद्य मानून सहा महिन्यांत केवळ शंभूचरित्राचा ध्यास घेत विजयराव देशमुख यांनी लिहिलेले शंभूराजेंचं चरित्र म्हणजेच राजा शंभू छत्रपती. या ग्रंथाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. जेमतेम ६ महिन्यांत तब्बल ११ हजार प्रती संपल्या. छत्रपती संभाजी महाराजांची खरी प्रतिमा समाजापुढे आणली आणि त्यांच्याविषयी आदर, भक्ती, श्रद्धा जनमानसात दृढ झाली. १९८९ साली वडू कोरेगाव येथे शंभूराजेंच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार होऊन त्यांचा ३०० वा बलिदानदिन साजरा झाला, त्यानिमित्ताने शंभूभक्तांची उसळलेली लाट त्यांच्यावरील अतूट निष्ठा आणि अपार आदर व्यक्त करणारी ठरली. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे, त्यांच्या कर्तृत्वाचे सच्चे दर्शन घडविणारा हा ग्रंथ प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवा.

मऱ्हाटी माती (ऐतिहासिक कथा संग्रह)

मऱ्हाटी माती (ऐतिहासिक कथा संग्रह)

हा ऐतिहासिक कथासंग्रह आहे. यात ऐतिहासिक सत्याचा धागा न सोडता, लालित्यपूर्ण शब्दपुष्पांनी त्या धाग्याचे रुपांतर सुंदर, सुगंधित पुष्पहारात केले आहे. या कथा सान-थोर अशा सर्वांचे मन वेधून घेतात. शहाजी महाराज ते थोरले माधवराव पेशवे असा मराठी रियासतीचा मोठा कालखंड, त्यातील निवडक कथांतून आपल्यापुढे उलगडतो. प्रत्येक प्रसंगातून काही मूल्य रुजविणाऱ्या या कथा आहेत. मराठी मातीची बुद्धिमत्ता, शौर्य, धैर्य, मराठी बाणा, परस्त्री मातेसमान ही शिकवण, निष्ठा, धैर्य, निर्धार, निर्भयता हे गुण दर्शविणाऱ्या या कथा आहेत.

सूर्यपूत्र

सूर्यपूत्र

प.पू. सद्गुरुदास महाराजांनी आपल्या धर्मकार्याचा भाग म्हणून ज्या व्यक्तिरेखांचा जीर्णोद्धार केला त्यात सूर्यपूत्र कर्णही आहे. धर्मस्थापनेसाठी श्रीकृष्णासमोर कर्णाने स्वेच्छेने आत्मसमर्पण केले. ज्यावेळी श्रीकृष्णाच्या आज्ञेने अर्जुनाने कर्णाचे मस्तक उडविले, तेव्हा त्याच्या देहातून तेज बाहेर पडून ते सूर्यमंडलात विलीन झालं असं महाभारतकार सांगतात. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून सद्गुरुदास महाराजांनी कर्णाने धर्मासाठी केलेले आत्मसमर्पण लोकांच्या दृष्टीस आणले. समरस होऊन वाचले, तर आपल्यात देखील सूर्यपूत्र दडला आहे. आपणही ईश्वरी अंश घेऊन आलो आहोत. आपण सुद्धा वर्तुळ पूर्ण करुन मुक्त व्हायचे आहे…नियतीचे बाहुले बनून शत्रुत्वाची घरे बांधून फिरायचे नाही, असा फार मोठा मानसिक धैर्य व सकारात्मकतेचा संदेश देणारे हे चरित्र प्रत्येकाने वाचायलाच हवे. 

महाराजांच्या मुलुखात

महाराजांच्या मुलुखात

सन १९७४ साली श्री शिवराज्याभिषेकाचे ३०० वे स्मृतीवर्ष होते. त्यानिमित्त प्रथमच शिवकथाकार विजयराव देशमुख महाराजांचा मुलुख बघायला निघाले. सोबत २०-२५ झपाटलेले शिवप्रेमी होते. या अद्भूत अशा यात्रेचा वृत्तांत म्हणजेच महाराजांच्या मुलखात! या पुस्तकाच्या प्रस्तावनेत घाणेकर सर लिहितात- एका जाणत्या राजाच्या मुलखाची एका ध्येयवेड्या मनस्वी माणसाने केलेली ही यात्रा होती. त्यांनी अनुभवलेल्या त्या क्षणांमध्ये आपणही कसे गुरफटलो जातो आहोत, हे न कळता आपण त्यात तल्लीन होत जातो. 

कथांगण

कथांगण

कथांगण म्हणजे शिवकथाकार श्री विजयराव देशमुख यांच्या ललित कथांचा संग्रह. विविध वृत्तपत्रांत वेळोवेळी प्रकाशित झालेल्या कथांचा हा संग्रह त्यांच्या ललित लेखनशैलीचा आगळा आविष्कार घडवितो. शहरी, ग्रामीण जीवन, दारिद्र्य, थंडी, वऱ्हाडी बोली, राजकीय व्यक्तित्वे यांचं हलकफुलकं चित्रण करणाऱ्या या कथा वाचणं म्हणजे एक प्रसन्न अनुभव.

कीर्तन कौस्तुभ (भाग १ ते ३)

कीर्तन कौस्तुभ (भाग १ ते ३)

प.पू. सद्गुरुदास महाराज वर्षातून एकदाच, म्हणजेच श्री दत्तजयंती उत्सवात कीर्तन करतात. त्यांच्या विविध किर्तनांचा संग्रह पुस्तकरुपाने कीर्तन कौस्तुभ म्हणून प्रसिद्ध आहे. यात अनेक विषयांवर, संतांवर, त्यांच्या वचनांवर आख्याने आहेत. संत गजानन महाराज, पुंडलिक महाराज भोकरे, दासगणू महाराज, टेंब्ये स्वामी महाराज, गोपाळ स्वामी महाराज, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या तसेच संच चरित्रातील कथा भाग, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांचे अभंग आदींचे अर्थ समजून घेण्यासाठी आणि जीवनात उतरविण्यासाठी `कीर्तन कौस्तुभ`चे तीनही भाग अत्यंत उपयुक्त आहेत. यातील कुठलेही पान काढून वाचले, की मन शांत होते असा अनेकांचा अनुभव आहे.

प्रवचन परिमल

प्रवचन परिमल

प.पू. सद्गुरुदास महाराज वर्षातून एकदाच, म्हणजेच श्री दत्तजयंती उत्सवात कीर्तन करतात. त्यांच्या विविध किर्तनांचा संग्रह पुस्तकरुपाने कीर्तन कौस्तुभ म्हणून प्रसिद्ध आहे. यात अनेक विषयांवर, संतांवर, त्यांच्या वचनांवर आख्याने आहेत. संत गजानन महाराज, पुंडलिक महाराज भोकरे, दासगणू महाराज, टेंब्ये स्वामी महाराज, गोपाळ स्वामी महाराज, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या तसेच संच चरित्रातील कथा भाग, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांचे अभंग आदींचे अर्थ समजून घेण्यासाठी आणि जीवनात उतरविण्यासाठी `कीर्तन कौस्तुभ`चे तीनही भाग अत्यंत उपयुक्त आहेत. यातील कुठलेही पान काढून वाचले, की मन शांत होते असा अनेकांचा अनुभव आहे.

सहज बोलणे हितोपदेश

सहज बोलणे हितोपदेश

प.पू. सद्गुरुदास महाराज हे श्रीगुरुमंदिरात दर गुरुवारी उपासनेनंतर उद्बोधन करतात. महाराजांनी अगदी सहज बोलण्यातून समजावून सांगितलेले मौलिक विचार या पुस्तकात संकलित करण्यात आलेले आहेत. आपले सण, उत्सव, जीवन आनंदी कसे जगावे, तणाव कसे दूर करावेत, उपासनेची शक्ती, सामर्थ्य या व अशा अनेक विषयांवर महाराजांनी साधलेला सहज संवाद आपल्या शंका, समस्यांना दूर करतो आणि विचारांनी नवी देत जगण्याची आगळी ऊर्जा देतो.

हनुमान चालिसा - एक चिंतन

हनुमान चालिसा - एक चिंतन

संपूर्ण भारतभरात हनुमंत हे सर्व भक्तांचे आवडते दैवत. हनुमान चालिसा या स्तोस्त्राचे अनेक मंदिरांतून नित्य पठन, गायन केले जाते. सद्गुरुदास महाराज यांनी, स्वतः अनुभवलेल्या भक्ती प्रत्ययावरुन गोस्वामी तुलसीदास रचित हनुमान चालिसा या स्तोस्त्राची अत्यंत सोप्या शब्दात, सोदाहरण आणि सखोल उलगड केली आहे.

समर्थ स्मरण

समर्थ स्मरण

राष्ट्र गोंधळात सापडले असताना आचार्यशक्तीच राष्ट्राच्या मदतीला धावून आली आणि योग्य मार्गदर्शन करुन तिने राष्ट्रास भयमुक्त केले, याचे आदर्श उदाहरण म्हणजे समर्थ स्मरण. समर्थ स्मरण हे १९७६ साली नागपूरच्या दासनवमी उत्सवात शिवकथाकारांनी दिलेल्या व्याख्यानांचे व त्यानंतर आचार्य विनोबांच्या घेतलेल्या मुलाखतीचे संकलन आहे. तेव्हा, आणीबाणीचा काळ होता. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांची मुस्कटदाबी चालली होती. जनमानस प्रक्षुब्ध होत होते. मोठी संभ्रमावस्था होती. सभा-संमेलनांवर निर्बंध होते. अशा परिस्थितीत दासनवमी उत्सव घेणे आणि त्यातून लोकांना योग्य तो संदेश देणे हे मोठं धाडसाचं काम होते. वर्तमानकाळ आणि समर्थकाळ यांच्यातील साम्यस्थळे शोधून वर्तमानकाळातील कोंडी फोडण्यासाठी कोणत्या प्रेरणा मिळतात, याचे दिशादर्शन शिवकथाकारांनी केले

सिंहासनाधीश्वर

sinhasanadhishwar

सिंहासनाधीश्वर

शिवकथाकार श्री विजयराव देशमुख हे सिद्धहस्त लेखक तसे उत्कृष्ठ नाटककारही आहेत. त्यांचा हा पैलू सिंहासनाधीश्वर या नाटकाच्या रुपाने पुढे येतो. मोठ्या व्यक्तींची दुःखे देखील मोठीच असतात. सामान्य व्यक्तीला सिंहासन दिसते, पण त्यासाठी त्या सिंहासनाधीश्वराने केलेली तपस्या, सोसलेले कष्ट, पणास लावलेले आयुष्य दिसत नाही. मग या कर्तृत्ववान व्यक्तीचे भावविश्व आणि व्यावहारिक विश्व यात संघर्ष निर्माण होतो. असाच संघर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उत्तर आयुष्यात निर्माण झाला. त्याचे विलक्षण आणि मन खिळवून ठेवणारे चित्रण या नाटकात आहे.