छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर-पुणे

जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार

राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर सर्वप्रथम विद्वानांचे पूजन केले. ती परंपरा कायम ठेवत छत्रपती सेवा प्रतिष्ठानने १९८२ सालापासून इतिहास, धर्म, संस्कृती या क्षेत्रात व्रतस्थ वृत्तीने कार्य करणाऱ्या समाजातील मान्यवरांना जिजामाता विद्वत गौरव पुरस्काराने पूजन व्रत सुरु केले, ते आजतागायत अखंड सुरु आहे. आजवर, अनेक महान विद्वान, तपस्वी, कलाकार या पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. नुकताच, २०२०-२१ चा जिजामाता गौरव पुरस्कार स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना प्रदान करण्यात आला. आणि २०२३ चा पुरस्कार भूवैकुंठ पंढरपूर येथील नामदेवगाथा व्रती श्री. प्रकाशराव निकते गुरुजींना प्रदान करण्यात आला.

जिजामाता विद्वत गौरव पुरस्काराचे मानकरी

अ क्रमानकरीस्थळवर्ष
डॉ वा वि मिराशीनागपूर१९८२
डॉ पु ग सहस्त्रबुद्धेपुणे१९८३
डॉ वि भि कोलतेनागपूर१९८४
प्रा ग ह खरेपुणे१९८५
सेतुमाधवराव पगडीनागपूर१९८६
महादेवशास्त्री जोशीपुणे१९८७
धुंडामहाराज देगलूरकरआळंदी१९८८
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीसातारा१९८९
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेनागपूर१९९०
१०गो नी दांडेकरपुणे१९९१
११डॉ श्री भा वर्णेकरनागपूर१९९२
१२भालजी पेंढारकरकोल्हापूर१९९३
१३बाळासाहेब देवरसनागपूर१९९४
१४समर्थभक्त अण्णाबुवा कालगावकरसातारा१९९५
१५ह भ प किसनमहाराज साखरेआळंदी१९९६
१६डॉ अजयमित्र शास्त्रीनागपूर१९९७
१७ह भ प बाबासाहेब सालपेकरनागपूर१९९८
१८वे शा सं यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरेऔरंगाबाद१९९९
१९डॉ जयसिंगराव पवारनागपूर२०००
२०शाहीर योगेशनागपूर२००१
२१वेदमूर्ती वसंतशास्त्री फडकेआळंदी२००२
२२डॉ म रा जोशीनागपूर२००३
२३वे शा सं विनायकशास्त्री टोळनागपूर२००४
२४श्री मिलिंद एकबोटेपुणे२००५
२५सुमतीताई सुकळीकरनागपूर२००६
२६डॉ गो ब देगलूरकरपुणे२००७
२७समर्थभक्त मारुतीबुवा रामदासीनागपूर२००८
२८डॉ भा रा अंधारेनागपूर२००९
२९ह भ प मुकुंदकाका जाटदेवळेकरऔरंगाबाद२०१०
३०पंडित हृदयनाथ मंगेशकरनागपूर२०११
३१प्र के घाणेकरपुणे२०१२
३२पंडितप्रवर गणेश्वरशास्त्री द्रविडनागपूर२०१३
३३सौ अपर्णाताई रामतीर्थकरनागपूर२०१४
३४श्री श्रीपाद केशव चितळेनागपूर२०१५
३५डॉ श्री द देशमुखनागपूर२०१६
३६डॉ रामचंद्र अनंत देखणेपुणे२०१७
३७डॉ अरविन्द प्र जामखेडकरनागपूर२०१८
३८प्रा स्वानंद पुंडनागपूर२०१९
३९भारतरत्न लता मंगेशकरमुंबई२०२० आणि २०२१
४०प्रकाश निकते गुरुजी पंढरपूर २०२३
pandit hrudaynath mangeshkar awarded by jeejamata vidvat puraskar