छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर-पुणे

व्याख्यानमाला

शिवकथाकार विजयराव देशमुख आपली अमोघ वाणी, श्रोत्यांना खिळवून ठेवणारी वक्तृत्वशैली आणि अभ्यासपूर्ण वृत्ती यांमुळे उभ्या महाराष्ट्रात परिचित आहेत. शिवरायांच्या गोष्टी ऐकून आणि सांगून आपलं बालपण समृद्ध झालं, असं ते सांगतात. महाविद्यालयीन जीवनात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमधूनही त्यांनी स्वयंसेवकांना शिवरायांच्या गोष्टी सांगून प्रेरित केले. पुढे त्यांची अभ्यासू शिवचरित्रकार व प्रतिभावंत व्याख्याता अशी ओळख निर्माण झाली. त्यांच्या व्याख्यानांचं गारुडच असं असं की ते ऐकण्यासाठी दूरदूरहून लोक त्यांना ऐकण्यासाठी येत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्यांनी देव, देश व धर्मासाठी केलेल्या असीम पराक्रमाच्या रोमांचित करणाऱ्या व्याख्यानांनी अवघा महाराष्ट्र मंत्रमुग्ध झाला. आजवर छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी १० हजारांहून व्याख्यानं देशभरात दिली आहेत. यातून लक्षावधी लोकांमध्ये शिवभावना जागृत झाली.