छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर-पुणे

किल्लेदर्शन यात्रा

छत्रपती शिवाजी महाराजांची खरी ओळख करुन देतात ती त्यांचे किल्ले. सर्व शिवभक्तांना स्वराज्याच्या भूमीचे दर्शन घडावे या हेतूने शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी शिवदुर्गदर्शन यात्रेचा शुभारंभ केला. या यात्रेत, शिवकथाकारांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून प्राचीन गड-किल्ल्यांचा इतिहास ऐकता ऐकता श्रोत्यांपुढे इतिहास जिवंत होई. तानाजी मालुसरे, येसाजी, राजमाता जिजाऊसाहेब यांची व्यक्तिमत्वे जणू डोळ्यांपुढे उभी राहात. रसाळ, भावोत्कट वत्त्कृत्व आणि क्षणात भूतकाळात नेऊन उभं करण्याची हातोटी तमाम यात्रेकरुंनी अनुभवली. या यात्रांच्या माध्यमातून हजारो शिवभक्त जोडले गेले आणि शिवकार्यास गती लाभली